युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उल्हासनगर महानगरपालिकेला भेट दिली
युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेला भेट देऊन उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. - यावेळी लॅब टेस्टिंग वाढवणे, कोरोनासंदर्भात जनजागृती, होम आयसोलेशनच्या रुग्णाचा दर ३ दिवसांनी रिपोर्ट घेणे, रुग्णांची नोंद ठेवून त्यांच्याशी संवाद साधणे, डॉक्टर व आरोग्यसेवकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, कोविड रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. - खासदार श्रीकांत शिंदे जी, आमदार बालाजी किणीकर जी, उल्हासनगरच्या महापौर लिलाबाई आशाण जी या बैठकीला उपस्थित होते.