मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम (LLM) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे - युवासेनेची मागणी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख श्री.आदित्य ठाकरे साहेबा यांच्या सुचनेनुसार मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी एलएलएम अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी कुलगुरु श्री सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली. मुंबई विद्यापीठात एलएलएम अभ्यासक्रमासाठी ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतात व ६०० विद्यार्थी एलएलएम ला प्रवेश घेतात. परंतु प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होवून त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होतो व याबाबत साशंकता निर्माण होवून प्रवेशप्रक्रिया न्यायप्रविष्ठ होते ,विद्यापीठाला वकिलांसाठी नाहक खर्च करावा लागतो. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन एलएलएम प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणी युवासेना सीनेट सदस्य वैभव थोरात, प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर,शशिकांत झोरे,शीतल शेठ-देवरुखक