परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी
आज युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार परदेशी शिक्षण व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासणी (ट्रांसक्रिप्ट) ऑनलाइन करण्याची मागणी युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी प्र-कुलगुरु श्री रविंद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी जायचे असेल, तेव्हा त्यांना पदवीची गुणपत्रिका तपासणी (Verification) म्हणजेच Transcript करणे जरूरीचे असते.
जागतिक धोरणानुसार वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस (W.E.S.) कडे कुरियर ने पाठवीने गरजेचे असते. याकरीता परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनाही मुंबई विद्यापीठ गाठावे लागते तसेच या प्रक्रियेकरीता 20 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी लागतो. या प्रक्रियेकरीता विद्यार्थ्यांचा खर्च व वेळ वाया जात आहे, या करीता मुंबई विद्यापीठ युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी ही प्रक्रिया आॅनलाइन करण्यात यावी अशी मागणी केली. ही प्रक्रिया आॅनलाइन झाल्यामुळे होणारे फायदे -
1. मुंबई विद्यापीठाने पदवीधर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका Transcript केल्यानंतर सदर transcript गुणपत्रिका विद्यापीठानेच W.E.S. ला आॅनलाइन पाठवणे. जेणेकरुन WES ला पुन्हा विद्यापीठाकडे ReVerification साठी पाठवावी लागणार नाही.
2. आॅनलाइन transcript पद्धतीमुळे एक महिन्याचा लागणारा कालावधी सात दिवसांत पूर्ण होणार अाहे.
3. विद्यार्थ्यांस वारंवार होणारा कुरीअरचा खर्च कमी होऊन त्याकरीता आॅनलाइन पद्धतीचे कमीत कमी खर्च विद्यापीठाने अाकारावे.
4. या प्रक्रियेकरीता परदेशी स्थायिक विद्यार्थ्यांना मुंबईत यावे लागणार नाही.
5. ही प्रक्रिया सुलभ, सोपी व जलदरीत्या होणार आहे.
युवासेनेतर्फे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर,वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु श्री रविंद कुलकर्णी यांना निवेदन दिले.
Comments
Post a Comment