आज युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार परदेशी शिक्षण व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासणी (ट्रांसक्रिप्ट) ऑनलाइन करण्याची मागणी युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी प्र-कुलगुरु श्री रविंद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी जायचे असेल, तेव्हा त्यांना पदवीची गुणपत्रिका तपासणी (Verification) म्हणजेच Transcript करणे जरूरीचे असते. जागतिक धोरणानुसार वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस (W.E.S.) कडे कुरियर ने पाठवीने गरजेचे असते. याकरीता परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनाही मुंबई विद्यापीठ गाठावे लागते तसेच या प्रक्रियेकरीता 20 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी लागतो. या प्रक्रियेकरीता विद्यार्थ्यांचा खर्च व वेळ वाया जात आहे, या करीता मुंबई विद्यापीठ युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी ही प्रक्रिया आॅनलाइन करण्यात यावी अशी मागणी केली. ही प्रक्रिया आॅनलाइन झाल्यामुळे होणारे फायदे - 1. मुंबई विद्यापीठाने पदवीधर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका Transcript केल्यानंतर सदर trans
Comments
Post a Comment