मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम (LLM) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे - युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम (LLM) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे - युवासेनेची मागणी
 


शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख श्री.आदित्य ठाकरे साहेबा यांच्या सुचनेनुसार मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी एलएलएम अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी कुलगुरु श्री सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली.

मुंबई विद्यापीठात एलएलएम अभ्यासक्रमासाठी ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतात व ६०० विद्यार्थी एलएलएम ला प्रवेश घेतात. परंतु प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होवून त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होतो व याबाबत साशंकता निर्माण होवून प्रवेशप्रक्रिया न्यायप्रविष्ठ होते ,विद्यापीठाला  वकिलांसाठी नाहक  खर्च करावा लागतो.
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन एलएलएम प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणी युवासेना सीनेट सदस्य वैभव थोरात, प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर,शशिकांत झोरे,शीतल शेठ-देवरुखकर,सुप्रिया करंडे,मिलिंद साटम,निखिल जाधव, धनराज कोहचाडे यांनी कुलगुरु श्री सुहास पेडणेकर  यांच्याकडे केली. सोबत कुलसचिव श्री अजय देशमुख देखिल उपस्थित होते.
तसेच एलएलएम चे अनेक विद्यार्थी मराठी भाषेतून उत्तरपत्रिका लिहित असतात पण प्रश्नपत्रिका मात्र इंग्रजीच असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते. विद्यार्थ्यांच्या सोयी करता  सदर प्रश्नपत्रिका मराठीत देखिल उपलब्ध करुन  देण्याची मागणी युवासेनेने कुलगुरुंकडे  केली.
#YuvasenaForYouth

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी