युवासेना in action



प्रिन्सिपल चा घेतला राजीनामा !! काल mgm पनवेल महाविद्यालयात एका बाहेरील विद्यार्थ्याने येऊन महाविद्यालयात एका मुलीचा विनयभंग केला, तातडीने त्यावर कार्यवाही करण्यास विलंब केल्याचं लक्षात येताच आज विद्यार्थिनी ह्या बाबत जाब विचारण्यासाठी, आणि तातडीने महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले ह्या आंदोलनाची युवसेनेने दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य साहेबांनी आणि कॉलेज कक्ष अध्यक्ष वरूण जी सरदेसाई यांनी दखल घेऊन मुलांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला ह्याच सुचनेने राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील  यांनी सकाळी तातडीने महाविद्यालयात जाऊन मुलांची भेट घेतली आणि आंदोलनात सहभागी होऊन सदर मागणीला पाठिंबा दिला।
विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार कॉलेज प्रशासनाने मुलांच्या समोर येऊन माफी मागावी त्या प्रकारे कॉलेज चे ट्रस्टी सुधीर कदम साहेब यांना घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना सामोरी गेलो आणि त्यांच्या हस्ते लिखित प्रिन्सिपल यांचा राजीनामा घेऊन दिला !!!
ह्या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार !!
युवासेना विद्यार्थ्यांसाठीच !!





Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी