Posts

Showing posts from June, 2019

हे लोकांच प्रेम 🙏❤️

हे लोकांच प्रेम 🙏❤️

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, आदित्य ठाकरेंची प्रमुख उपस्थिती

Image
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुवारी पार पडला. संकष्टी चथुर्तीच्या मुहूर्तावर राजाचे पाद्यपूजन केले गेले. या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आदित्य ठाकरे यांनी लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित राहून बाप्पाचे आशीर्वाद घेतले. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा या गणपतीची ख्याती देशविदेशात पसरली आहे. गुरुवारी 20 जूनला संकष्टीच्या मुहूर्तावर राजाचा पाद्यपूजन सोहळा झाला. त्यानंतर राजाची मूर्ती बनविण्यास सुरुवात होईल. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात येत आहे. या वर्षीही पाद्यपूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेचे उपनेते पद बहाल

Image
शिरूर मतदान संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेचे उपनेते पद बहाल ५३वर्षशिवसेनेची

युवासेनेमुळे परमेश्वरीदेवी तिबरेवाला (बगारका) कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय !!

Image
आज अंधेरी येथील परमेश्वरीदेवी तिबरेवाला लायन्स (बगारका) कॉलेजच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कॉमर्सच्या अनुदानित (aided) च्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव त्यांच्याच विनाअनुदानित (unaided) च्या वर्गात कॉलेज प्रवेश घेण्याची सक्ती करण्यात येत होती. सर्व विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे संपर्क साधला असता युवासेना प्रमुख व शिवसेना नेते श्री.आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव श्री. वरुण सरदेसाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी प्रिंसिपल श्रीमती त्रिशला मेहता व रजिस्ट्रार श्री शाह यांची भेट घेतली व जाब विचारला आसता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना अनुदानित तुकड्यांमधेच प्रवेश देण्याचे मान्य केले. अनुदानित तुकड्यांचे शुल्क विना आनुदानित पेक्षा कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार. या प्रसंगी विद्यापिठा सिनेट सदस्य प्रदीपसावंत,राजन कोलंबेकर,शशिकांत झोरे,शीतल शेठ देवरुखकर, मिलिंद साटम, सहसचिव संदीप_बोरेकर, कॉलेज कक्षचे प्रिंस चाको उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन केले.

Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज माझगाव, मुंबई येथील सेंट मेरी स्कूल येथे ५४.६ kWp रूफटॉप सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन केले. . . Yuvasena President Aaditya Thackeray inaugurated the 54.6 kWp Rooftop Solar Power Plant at St. Mary's School in Mazgaon, Mumbai.

५३ व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा !  

Image
५३ व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा !  

११वी प्रवेशासाठी अतिरिक्त तुकड्या वाढवून देण्याबाबतची युवासेनेची मागणी मान्य

Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता दहावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख  मा. आदित्यसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजी यांची दि.१२ जून रोजी भेट घेतली होती. तसेच ह्या वर्षी सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढवून देण्यात याव्यात जेणेकरून ११वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं सोपं जाईल, अशी मागणी केली होती. ही मागणी शालेय शिक्षणमंत्री  श्री. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मांडून अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त तुकड्या वाढून देण्यात येतील असे जाहीर केले आहे. तसेच इयत्ता दहावी साठी भाषा व समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत गुण कायम ठेण्यात यावेत यासाठीचा पाठपुरावा युवासेना करेल.

लोकसभेत घुमला मराठी आवाज !!!!

लोकसभेत घुमला मराठी आवाज !!!!! कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत यांनी मराठीत खासदारकीची शपथ घेतली. https://www.instagram.com/p/ByzS49GFx-V/?igshid=fjrgeqkf5629

इंग्लंड मध्ये शिवसेनेचा वाघ !!!!!

Image
मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात ठाण्यातील प्रेक्षकांनी झळकावले मोदी आणि बाळासाहेबांचे बॅनर इंगलंड येथे विश्वचषक बघण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षकांनी आगरी-कोळी टोप्या परिधान करून सामन्याचा आनंद लुटला. दिवा गावातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंगलंड येथे विश्वचषक पाहण्यासाठी गेले असून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामना पावसामुळे रद्द झाल्याने या प्रेक्षकांनी भारत-पाक सामन्याचा मनमुराद आनंद लुटला आणि सामन्या दरम्यान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर झळकावले.सदर बॅनर वर हिंदुस्थान के दो शेर असे लिहिण्यात आले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार!

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार! https://www.instagram.com/p/BysvnAIhavC/?igshid=pp75exngk4f5

युवासेना युवती मुलाखती

Image
युवासेना युवती मुलाखती सन्माननिय युवासेनाप्रमुख व शिवसेनानेते श्री.आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार युवती सेना आता अखंड महाराष्ट्रभर सक्रीय होणार , महाराष्ट्राच्या गावखेड्यांतिल युवतींना देखिल महाराष्ट्राच्या राजकिय प्रवाहात सहभागी होण्याची संधी चालून येत आहे ! नगर आणि साईनगरी - शिर्डी,  संभाजी नगर येथे होणार विविध पदांच्या नेमणुकींसाठी मुलाखती !! दिनांक : १४ ,१५,१६,१७ जुन २०१९  युवतींनो तयारीला लागा....आता उठवू सारे रान आता पेटवू  सारे रान !!

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची संयुक्त बैठक पार पडली.

Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत खालील मुद्द्यांवर विचार विनिमय झाला: -मुंबई महापालिका शाळा आणि ब्रिटीश काउन्सिल यांचे एकत्रीकरण -दंतचिकित्सा आणि मानसिक स्वास्थ्य शिबिर -NABET -खेळविषयक उपक्रमांचे नियोजन व आढावा -स्वसंरक्षण -शाळेला जोडलेल्या मैदानांची यादी व सद्यस्थिती -पुनर्निर्मित आणि पुनर्निर्माणासाठी प्रस्तावित असलेल्या शाळांचा आढावा -महापालिका शाळेच्या दर्शनी भागात नामफलकाची चौकट -महापालिका शाळांची जाहिरात प्रसिद्धी -डिजिटल क्लासरूम
Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज  #WorldEnvironmentDay  सोहळा-२०१९ या कार्यक्रमात प्लास्टिक बंदी सुधारित मोबाईल  अॅपचा   शुभारंभ करून वर्तमानातील प्रदूषण नियंत्रण विषयक जनजागृतीच्या चळवळीस मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, पर्यावरण मंत्री रामदास कदम जी उपस्थित होते.