युवासेनेमुळे परमेश्वरीदेवी तिबरेवाला (बगारका) कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय !!


आज अंधेरी येथील परमेश्वरीदेवी तिबरेवाला लायन्स (बगारका) कॉलेजच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कॉमर्सच्या अनुदानित (aided) च्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव त्यांच्याच विनाअनुदानित (unaided) च्या वर्गात कॉलेज प्रवेश घेण्याची सक्ती करण्यात येत होती.
सर्व विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे संपर्क साधला असता युवासेना प्रमुखशिवसेना नेते श्री.आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव श्री. वरुण सरदेसाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्यांनी प्रिंसिपल श्रीमती त्रिशला मेहता व रजिस्ट्रार श्री शाह यांची भेट घेतली व जाब विचारला आसता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना अनुदानित तुकड्यांमधेच प्रवेश देण्याचे मान्य केले. अनुदानित तुकड्यांचे शुल्क विना आनुदानित पेक्षा कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार.
या प्रसंगी विद्यापिठा सिनेट सदस्य प्रदीपसावंत,राजन कोलंबेकर,शशिकांत झोरे,शीतल शेठ देवरुखकर, मिलिंद साटम, सहसचिव संदीप_बोरेकर, कॉलेज कक्षचे प्रिंस चाको उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी