११वी प्रवेशासाठी अतिरिक्त तुकड्या वाढवून देण्याबाबतची युवासेनेची मागणी मान्य


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता दहावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख 
मा. आदित्यसाहेब ठाकरे यांनी
मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजी यांची दि.१२ जून रोजी भेट घेतली होती.
तसेच ह्या वर्षी सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढवून देण्यात याव्यात जेणेकरून ११वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं सोपं जाईल, अशी मागणी केली होती.
ही मागणी शालेय शिक्षणमंत्री 
श्री. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मांडून अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त तुकड्या वाढून देण्यात येतील असे जाहीर केले आहे.
तसेच इयत्ता दहावी साठी भाषा व समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत गुण कायम ठेण्यात यावेत यासाठीचा पाठपुरावा युवासेना करेल.



Comments

Popular posts from this blog

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी

एक आठवण