लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, आदित्य ठाकरेंची प्रमुख उपस्थिती

नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुवारी पार पडला. संकष्टी चथुर्तीच्या मुहूर्तावर राजाचे पाद्यपूजन केले गेले. या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आदित्य ठाकरे यांनी लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित राहून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.





लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा या गणपतीची ख्याती देशविदेशात पसरली आहे. गुरुवारी 20 जूनला संकष्टीच्या मुहूर्तावर राजाचा पाद्यपूजन सोहळा झाला. त्यानंतर राजाची मूर्ती बनविण्यास सुरुवात होईल. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात येत आहे. या वर्षीही पाद्यपूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी